नगर पालिका निवडणुकीआधीच राष्ट्रवादीत दुफळी उघड, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा म्हणणाऱ्या कुमार शेट्ये यांच्याच चोराच्या उलट्या बोंबा- ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये यांचा खळबळजनक आरोप
आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीआधीच रत्नागिरी शहरातील राष्ट्रवादीमधील दुफळी उघड झाली आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत
रत्नागिरी तालुका आणि शहरामधिल संघटनांतर्गत कुमार शेट्ये यांचा पोरखेळ सुरु असून पक्षात फुट पाडणे बंडखोरी करणे ह्याची पुर्वापार सवय आहे आणि ते सर्व रत्नागिरीतील जनतेला ज्ञात आहे असा खळबळजनक आरोप माजी जिल्हापरिषद अध्यक्ष आणि जेष्ठ नेते श्री. राजाभाऊ लिमये यांनी केला आहे रविंद्र उर्फ भाऊ सुर्वे ज्यावेळी विधानसभेला उभे राहीले त्यावेळी कुमार शेट्येनी सभापती असताना पक्षाच्या विरोधात बंडोखोरी केली, २०१४ ला बशीरभाई मुर्तुझा विधानसभेला उभे राहीले होते त्यावेळीसुध्दा पक्षाच्या विरोधात काम केले त्यानंतर २०१६ ला उमेश शेट्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे राहीले त्याहीवेळेला पक्षाच्या विरोधात काम केले असा हा माणूस पक्ष संपवायला बसला आहे असे जेष्ठ नेते श्री. राजाभाऊ लिमये, प्रांतिक सदस्य श्री. बशीरभाई मुर्तुझा, पक्षप्रतोद श्री. सुदेशजी मयेकर यांनी सांगितले.
कुमार शेट्ये यांनी आता मार्गदर्शन करायचे सोडून प्रदेश कार्यालयामध्ये फेऱ्या मारुन ह्याला काढा त्याला करा अशा नको त्या उचापती सुरु असल्याचे माजी जिल्हापरिषद अध्यक्ष आणि जेष्ठ नेते श्री. राजाभाऊ लिमये यांनी सांगितले. पक्षाच्या नावाने कार्यालय काढायचे आणि काही जणांना बरोबर घेऊन पक्षामध्ये उचापती करायच्या हेच त्यांचे दैनंदिन काम अनेक वर्षापासून सुरु असल्याचे श्री. राजाभाऊ लिमये यांनी सांगितले.
रत्नागिरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय बंद करून स्वताःचे वैयक्तीक कार्यालय काढून दुसऱ्या पक्षातुन आलेले २-४ पदाधिकारी बरोबर घेऊन आपल्याच पक्षातील पदाधीकाऱ्यांबद्दल कटकारस्थान सुरु असल्याचे दिसुन येत आहे असे श्री. राजाभाऊ लीमये आणि श्री. बशीरभाई मुर्तुझा यांनी सांगितले. रत्नागिरी तालुक्यात २ विधानसभा लढवलेले नेते तसेच पक्षप्रतोद असताना नगरपालीका दुसऱ्या कोणाच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा प्रश्नच येतो कुठे असा खडा सवाल मा. राजाभाऊ लिमये यांनी केला आहे. नगरपालीकेची निवडणूक ही विधानसभा लढवलेले उमेदवार आणि शहराध्यक्ष त्याच बरोबर तालुका अध्यक्ष यांना बरोबर घेउनच नगरपालीका निवडणूकीचे धोरण निच्छित करणे गरजेचे असताना अन्य पदाधीकारी यांची नावे टाकून पक्षामध्ये गट तट करुन फुट पाडणारा हा म्होरक्या कोण आहे तो सर्वाना माहीत आहे.
रत्नागिरीतील सगळे पदाधीकारी आणि कार्यकर्ते जेष्ठ नेते श्री. राजाभाऊ लिमये, प्रांतिक सदस्य श्री. बशिरभाई मुर्तुझा, पक्षप्रतोद श्री. सुदेश मयेकर यांच्याशी फोनवरून संपर्क करुन आणि घरी येऊन प्रत्यक्ष भेटुन हे नेमके काय चालले आहे पक्षामध्ये फाटाफुट पाडण्याचे काम कुमार शेट्येच करीत आहेत आणि त्यांना ती पुर्वी पासूनची सवय असल्यामुळे पक्षहीतासाठी श्री. कुमार शेट्ये यांना पक्षातुन काढुन टाका अशी मागणी केली आहे.
पक्षातील पदाधीकाऱ्यांची निवड झाली आहे ते सगळे तोंडी निवड न करता निरिक्षकांनी इथे येऊन अहवाल तयार करुन नियुक्ती केलेल्या आहेत असे श्री. सुदेश मयेकर यांनी सांगितले आहे. कुमार शेट्ये आपल्याच मुलांना आणि मर्जीतील माणसांना पक्षातील पदे कशी मिळतील ह्याचा विचार करुन नको ते राजकारण करुन पक्षामध्ये फुट पाडत असुन त्यांच्यावर कार्यवाई करा असे आपण सर्व पदाधीकाऱ्यांच्या सह्या घेउन प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे मागणी करणार असल्याचे जेष्ठ नेते श्री. राजाभाऊ लिमये, प्रांतिक सदस्य श्री. बशिरभाई मुर्तुझा, पक्षप्रतोद श्री. सुदेश मयेकर सांगितले आहे.
रत्नागिरी तालुका आणि शहर संघटनेमध्ये कुठलाही सभ्रम नाही सर्व सेलचे अध्यक्ष हे एकत्र असुन त्यामध्ये फुट पाडण्याचे काम कुमार शेट्ये यांच्याकडूनच होत असुन प्रदेश कार्यालयामध्ये जाऊन खोटे नाटे सांगण्याच्या उचापती सुरु आहेत. ह्या एकामुळेच पक्षाबद्दल बाहेर चर्चा होत असुन लवकरच सर्व जण मिळून कार्यवाई करू असे जेष्ठ नेते श्री. राजाभाऊ लिमये, प्रांतिक सदस्य श्री. बशिरभाई मुर्तुझा, पक्षप्रतोद श्री. सुदेश मयेकर यांनी सांगितले..
www.konkantoday.com