मुरबे गावातील मच्छिमार चंद्रकांत तरे यांचे नशीब एका रात्रीत फळफळले

पालघर : मासेमारीच्या हंगामात मच्छिमारांसाठी रोजचा दिवस सारखा नसतो. कधी मासेमारी चांगली झाली तर भरपूर कमाई आणि हाती काहीच लागले नाही तर शून्य कमाई. पण मुरबे गावातील मच्छिमार चंद्रकांत तरे यांचे नशीब एका रात्रीत फळफळले.त्यांच्या बोटीच्या जाळ्याला लागलेले मासे विकून दीड कोटीहुन अधिकची कमाई झाली आहे. पालघरच्या समुद्रात मासेमारी दरम्यान हा चमत्कार झाला आहे. सोमवारी व्यापाऱ्यांनी दीड कोटींची बोली लावून घोळ मासे खरेदी केले. त्यामुळे पुन्हा एकदा मुरबे गाव प्रकाश झोतात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button