भास्कर काका तुमच्या आशीर्वादाची उणीव मला भविष्यात कायम भासणार. एका भरभक्कम आधाराला मुकलो…उदय सामंत
माझ्या राजकीय प्रवासात नेहमीच मला ज्यांच मोलाचं मार्गदर्शन मिळत आलं असे मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे माजी प्रधान सचिव,निवृत्त न्यायाधीश भास्कर शेट्ये साहेब आज आपल्यामध्ये नाही हे ऐकून विश्वास बसत नाही, माझ्या 2004 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी मला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन केलं आहे,अगदी माझ्या सर्वच पक्षीय, सामाजिक,शैक्षणिक कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित राहत,मुद्दाम इथे एक आठवण सांगतो ,2004 ला निवडून आल्यानंतर मुंबई येथील अधिवेशनामध्ये त्यांनी विधांनसभेमध्ये कोयना अवजल हा विषय मांडण्यासाठी सांगितला, त्यानी या विषयासाठी मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं होतं,तो विषय विधानसभेत गाजला,त्यावर मंत्रालयात बैठका झाल्या अगदी पेंडसे समिती नेमून त्याचा अहवाल सादर होऊन तो सभागृहात पटलावर पण आला,कोयनेचे अवजल कोकणासाठी मिळावे,कोकण समृद्ध व्हावे यासाठी ते खूप प्रयत्नशील होते,अगदी आमच्या अलीकडच्या संभाषणामध्ये देखील त्यांनी मला आवर्जुन सांगितले ,उदय जरा ते कोयनेचे अवजल कोकणात येण्यासाठी मंजुरी आण,त्यांचं शरीर थकलं होत परंतु त्यांची काम करण्याची उमेद जबरदस्त होती,शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतलं, अगदी पूर्णपणे समर्पित होऊन,माझ्या या राजकीय प्रवासात माझ्या सोबत अगदी मनापासून असलेल व्यक्तिमत्व आता माझ्या सोबत नाही हे खूप वेदनादायी आहे.भास्कर काका तुमच्या आशीर्वादाची उणीव भविष्यात मला नक्कीच जाणवणार एक भरभक्कम आधाराला मुकलो !!