डी-मार्ट जवळ असलेल्या ब्रिज पासून कुवारबावला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अनेक फेरीवाल्यानी आपला धंदा मांडल्याने अपघाताचा धोका
रत्नागिरी कुवारबाव दरम्यान
डी-मार्ट जवळ असलेल्या ब्रिज पासून कुवारबावला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अनेक फेरीवाले आपला धंदा मांडुन बसलेले दिसतात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने लावलेली दिसत आहेत ही दुकाने अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत यांची लोकांमध्ये चर्चा दिसून येते रत्नागिरी शहरात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्यामुळे रस्त्यावर सतत वाहनांची ये-जा चालू असते त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही
www.konkantoday.com