
केंद्राकडून आलेल्या लसीपैकी मुंबई पुण्यातच लस जास्त , सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्य़ांमध्ये बाधितांचे प्रमाण दोन टक्क्य़ांहूनही अधिक आहे, मात्र लशींचा साठा १.३० टक्कय़ांहूनही कमी
राज्यात सर्वाधिक बाधित आणि लोकसंख्याही अधिक असलेल्या मुंबई-पुण्याला प्रत्येकी सुमारे ११ टक्के मात्रांचा साठा देण्यात आला आहे, तर रुग्णसंख्या एक लाखाहून अधिक असलेल्या पालघर आणि रायगड जिल्ह्य़ाला मात्र दोन टक्कय़ांपेक्षाही कमी लसमात्रांचे वितरण करण्यात आले आहे.राज्याला आतापर्यंत केंद्राकडून सुमारे पाच कोटी ७१ लाख लसमात्रा मिळाल्या आहेत. यातील सुमारे ४ कोटी ७३ लाख लशींच्या मात्रांच्या जिल्हानिहाय वाटपाच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक ५५ लाख ९९ हजार मात्रा (११.८३ टक्के) मुंबईला आणि सुमारे ५२ लाख ८१ हजार मात्रा (११.१५ टक्के) पुण्याला मिळाल्या आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्य़ांत दुसऱ्या लाटेने बराच काळ थैमान घातले. या जिल्ह्य़ांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण २ ते ३ टक्के असले तरी रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लशींचा साठा मात्र इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत अधिक प्रमाणात दिला गेला आहे. यात कोल्हापूरमध्ये २२ लाख ४३ हजार (४.७४ टक्के) मात्रा, तर सातारा, सांगलीला अनुक्रमे सुमारे १५ लाख ८२ हजार आणि सुमारे १६ लाख २८ हजार मात्रा पुरविल्या गेल्या आहेत.उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्य़ांमध्ये बाधितांचे प्रमाण दोन टक्क्य़ांहूनही अधिक आहे, मात्र लशींचा साठा १.३० टक्कय़ांहूनही कमी देण्यात आला आहे. बाधितांच्या एकूण संख्येमध्येही राज्यात सातारा, सांगली खालोखाल रायगडमध्ये बाधितांची संख्या १,८८,५०९ आहे. मात्र तरीही या जिल्ह्य़ाला सुमारे ८ लाख ७२ हजार (१.८४ टक्के) लससाठा प्राप्त झाला आहे. तर आरोग्यमंत्र्याच्या जालना जिल्ह्य़ाला रुग्णसंख्या सुमारे ६० हजार असूनही लससाठा मात्र सुमारे ८ लाख १३ हजार (१.७२ टक्के)लससाठा मिळाला आहे.
www.konkantoday.com