अनेक पुरक आणि लघू उद्योगांना चालना देणारा नाणार रिफायनरी प्रकल्प होणारच -केंद्रीय मंत्री नारायण राणे
कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक असलेला आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सव्वा लाख बेरोजगारांना रोजगार देणारा, अनेक पुरक आणि लघू उद्योगांना चालना देणारा नाणार रिफायनरी प्रकल्प होणारच अशी घोषणा केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजापूर येथे केली.
प्रकल्प होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्न करतायत पण तुंम्ही काळजी करू नका रिफायनरी होणारच असे आश्वासन यावेळी ना. राणे यांनी दिले.
आपल्याकडे असलेल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अनेक योजना आहेत, ज्याचा लाभ घेऊन तुंम्ही उद्योजक होऊ शकता. तेव्हा माझ्या कोकणातील तरूण-तरूणीनो आता थांबून नका, रोजगार मागत फिरण्यापेक्षा इतरानांना रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक व्हा मी आणि केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे असेही राणे म्हणाले
www.konkantoday.com