चिपळूण येथे महानेटची केबल टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगाराचा विजेचा धक्का बसून मृत्यू
विद्युत पुरवठा सुरू असतानाही विद्युत खांबावर चढून महानेटची केबल टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगाराचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चिपळूण शहरात मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्यासुमारास घडली. सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच त्याने प्राण सोडले. सचिन संभाजी यादव (वय ४२, रा. चाफवली, संगमेश्वर) असे या कामगाराचे नाव आहे.
सचिन यादव व काही सहकारी मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्यासुमारास चिपळूण पंचायत समितीसमोरील परिसरात महानेटची केबल टाकण्याचे काम करत होते.या विद्युत खांबावरून केबल नेत असताना विद्युत पुरवठा सुरू असलेल्या विद्युत खांबावर सचिन यादव चढले होते. ती केबल विद्युत खांबावरून टाकताना विद्युत वाहिनीचा जोरदार धक्का बसून ते खाली कोसळले.
www.konkantoday.com