नगरसेवक ,नगराध्यक्ष , मुख्याधिकारी यांच्यावर फाैजदारी गुन्हे दाखल करावेत काँग्रेसची मागणी
*रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता नागरिकांना सहन करावा लागणारा आर्थिक मानसिक शारीरिक त्रासाला जबाबदार कोणाला धरायचे ? सगळे रत्नागिरीतील तथाकथित रस्ते वरील खड्डे यांची जबाबदारी नगराध्यक्ष अन धुरिणांना घ्यावी लागेल पण रस्ते खोडाईबाबत शासनाचे नियम आहेत त्याप्रमाणे काम करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे. *त्यांनी नियमाची अंमलबजावणी केली का ? नगरसेवकांनी काय केले*?
*मुंबई उच्च न्यायालयाने रस्ते या विषयात सुस्पष्ट सूचना दिल्या आहेत .१) रस्त्याचे काम सुरू करताना कामाचा एक फलक लावयाचा आहे २) त्यावर कंत्राटदाराचे नाव ,फोन ,कामाचे स्वरूप ,कालावधी अशी माहिती प्रदर्शित करायची आहे ३ )कंत्राटदाराच्या अटी आणि तपशील जाहीर करायच्या आहेत.४) एक तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करायची असून तिला प्रसिध्दी द्यायची आहे. उच्च न्यायालयाची निकालाची प्रत ग्राहक पंचायतीने सर्व नगरपालिका आणि जिल्हाधिकारी त्यांना दिड वर्षापूर्वी दिली होती आणि अमलबजावणी करण्याची मागणी केली होती.
*रस्त्याचे सध्याचे काम कोणाला दिले आहे आणि त्याच्या अटी शर्ती काय आहेत हे रत्नागिरी नगरपालिकेने जाहीर करावे *अन्यथा संबंधितावर फोजदारी गुन्हे दाखल करा अशी त्रासलेल्या जनतेच्या वतीने काँग्रेसचे मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांच्याकडे मागणी केली. तदप्रसंगि जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी , महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत मिडिया प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे,जिल्हा सरचिटणीस दिपक राऊत, महिला तालुकाध्यक्ष रिझवाणा शेख, विधानसभा अध्यक्ष सचिन मालवणकर, शगुप्ता ठाकूर,यासीन ठाकूर उपस्थित होते.
www.konkantoday.com