NSCC परीक्षेच्या मेरिट लिस्टमध्ये बाकाळे शाळेचे धवल यश
राजापुर तालुक्यातील जि. प. शाळा बाकाळेचे इ. १ली ते ४ थी पर्यंत ६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्या पैकी ६ विद्यार्थी पास झाले असून शाळेचा निकाल १००% लागला आहे.त्यापैकी इ.१ली मधील मानस ओमकार गाडगीळ २०० पैकी १९८ गुण मिळवून राज्यात मेरीट मध्ये १ला आला तर नील पवन परांजपे २००पैकी १९४गुण मिळवून राज्यात ३ रा आला. इयत्ता २रीमध्ये मृण्मयी संदीप मयेकर २००पैकी १९४ गुण मिळवून राज्यात २री व शर्वरी श्रीनिवास तारकर २००पैकी १८८ गुण मिळवून राज्यात ५वी आली आहे तसेच सान्वी अरुण थोरबुले हिने २०० पैकी १७६ गुण मिळविले आहेत तर इयत्ता ४थी मधील दिप देवेश पंगेरकर ह्याला २००पैकी १५६गुण मिळाले आहेत. बाकाळे शाळेसह जानशी गावचे नाव उज्वल करणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले असून या यशामध्ये मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या सर्व शिक्षक वर्गाचे गावचे सरपंच,पोलिसपाटिल ,गावातील प्रतिष्ठित नागरिक यानी खूप खूप अभिनंदन केले आहे. कोरोनासारख्या मारामारीच्या काळात शाळेला मिळालेले हे यश खूपच कौस्तुकस्पद आहे असल्याची प्रतिक्रिया जानशी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच ,मुंबईचे शाखाप्रमुख संदीप शिवलकर यानी दिली आहे.शिवलकर यानी त्यांचे अभिनंदन ही केले आहे
www.konkantoday.com