जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील जिल्हा रुग्णालय तसेच नव्याने सुरू झालेल्या महिला रुग्णालयातील सर्व साधनं सुविधांची पाहणी केली
रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या संपूर्ण आरोग्य सेवेचा आढावा जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आज घेतला. त्यांनी आज येथील जिल्हा रुग्णालय तसेच नव्याने सुरू झालेल्या महिला रुग्णालयातील सर्व साधनं सुविधांची पाहणी करून याबाबत संबंधितांशी चर्चा केली. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे हे त्यांच्या समवेत या भेटीदरम्यान होते.
जिल्ह्यातील कोविड बाबतची स्थिती नियंत्रणात आली आहे , मात्र तरीदेखील रूग्ण वाढीचा धोका वाढू नये त्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांनी दोन्ही रुग्णालयांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली व उपलब्ध सुविधा औषधांची उपलब्धता आणि व्हेंटिलेटर यंत्रणा तसेच ऑक्सिजन पुरवठा आदींबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
www.konkantoday.com