परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करताय? दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर टेस्टचा रिपोर्ट जवळ बाळगणे आवश्यक

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी सरकारने अट घातली आहे. या लोकांनी दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर टेस्टचा रिपोर्ट जवळ बाळगणे आवश्यक आहे. तिसऱ्या कोरोना लाटेचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा आरटी-पीआर निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सीमेजवळ दाखवावा लागणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button