दहा फवारणी कर्मचार्यांचा १५ ऑगस्टला कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राज्य सरकारने २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेला आरोग्य भरतीचा निकाल जवळ जवळ चार महिन्यानंतर जाहीर कला आहे. या निकालामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दहा हंगामी कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र बीड व इतर ठिकाणाहून हंगामी कर्मचारी असल्याचे बोगस प्रमाणपत्र धारक उमेदवार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रत्नागिरीतील एकही उमेदवार अंतिम यादीमध्ये येवू शकलेला नाही. त्यामुळे दहा उत्तीर्ण कर्मचार्यांनी १५ ऑगस्ट रोजी आपापल्या घरीच आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. www.konkantoday.com