बोनाफाईड सर्टीफिकेट, मार्कलिस्ट मागायला गेलेल्या पालकाकडे शाळांकडून आधी यावर्षीची पूर्ण फी भरण्याची सक्ती, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली मार्गदर्शन करण्याची मागणी
एस एस सी मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांकडून फी वसूलीसाठी सक्ती करण्याचा प्रकार वाढत आहे. आधीच कोरोना काळामध्ये देशोधडीला लागलेली जनता त्यात शाळा बोनाफाईड सर्टीफिकेट, मार्कलिस्ट मागायला गेलेल्या पालकाकडे आधी यावर्षीची पूर्ण फी भरा नाहीतर कोणतेच कागदपत्र दिले जाणार नाही असे धमकीवजा सुनावण्यात येते. शाळेत आमची मुले आलीच नाहीत, परीक्षा झाली नाही तर आम्ही फी का आणि कुठून भरायची असा प्रश्न पालकांकडून विचारला जातो आहे. त्यात पुढील शिक्षणासाठी लागणारा जातीचा दाखला तत्सम कागदपत्रे शाळा देणार नसतील तर काय करायचे ? हा महत्वाचा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे .त्याबाबतीत घाबरलेले पालक व अडचणीत सापडलेल्या संधीचा फायदा घेऊन वसुली करणाऱ्या शाळांना मार्गदर्शन करावे अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ.बी एन पाटील यांच्याकडे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. त्यावेळी मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे,विधानसभा अध्यक्ष सचिन मालवणकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
www.konkantoday.com