दापोली नगरपंचायतीच्या लसीकरण केंद्राला काही जणांनी कुलूप लावले,दापोली नगरपंचायतीचा भोंगळ कारभार

दापोली नगरपंचायतीच्या लसीकरण केंद्राला काहीजणांनी कुलूप लावून चाव्या घेवून जाण्याच्या प्रकारानंतर नगरपंचायतीचा प्रशासकीय भोंगळपणा उघड झाला असून, दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे हे २ ऑगस्टपासून कोरोनामुळे रजेवर असले तरी त्यांचा रजेचा अर्ज नगरपंचायत प्रशासनाकडे नसल्याने व रोडगे रजेवर जावून आठ दिवसांचा कालावधी झाला तरी जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्याधिकारी पदाचा कार्यभार अन्य कोणाकडे दिलेला नसल्याने या प्रकारची जबाबदारी घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयातील कोणीही अधिकारी तयार नसल्याचे दिसून आले.लसीकरणासाठी तेथे नागरिक आले तेव्हा तेथे कुलूप लावलेले दिसले मात्र या कुलूपाची चावी कोणाकडे ही मिळत नसल्याने हे नेमकं कुलूप लावले कोणी हा प्रश्न पडला आहे www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button