लोटे औद्योगिक वसाहतीसह परिसरातील सुमारे बारा गावांवर पाणी संकट उभे ठाकले
२२ जुलै रोजीच्या महापुराचा फटका बसून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने आणि जुनी पाईपलाईन सातत्याने फुटू लागल्याने लोटे औद्योगिक वसाहतीसह परिसरातील सुमारे बारा गावांवर पाणी संकट उभे ठाकले आहे. पाण्याअभावी वसाहतीमध्ये अनेक कारखाने बंद पडले असून जनतेवर ऐन पावसाळ्यात पाणी पाणी करण्याची नामुष्की ओढवली आहे. गेले अठरा दिवस पाणी पुरवठा ठप्प असल्याने उद्योगांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे हा पाणी पुरवठा तात्काळ सुरक्षित करावा अशी मागणी लोटे परशुराम इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com