डिंसेबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होताना दिसत आहे. डिंसेबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधीं च्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. यावेळी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. आतापर्यंत कायमच शिवसेना आणि मनसेनं इथे सभा घेतल्या आहेत. पण आता पक्षाचं पुर्नरुजीवन करण्यासाठी आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेसही शिवतीर्थावर सभा घेणार आहे
www.konkantoday.com