रत्नागिरी शहराजवळील पारसनगर येथे चोरट्यांनी घरातील रोख रक्कम १९ हजार ५०० रुपयांसह चांदीचे दागिने पळविले
रत्नागिरी शहराजवळील पारसनगर येथे चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा उचकटुन घरातील रोख रक्कम १९ हजार ५०० रुपयांसह चांदीचे दागिने पळविले.
उत्तम बाळकृष्ण वीर (रा. पारसनगर, रत्नागिरी) यांच्या मालकीच्या घराचे तसेच त्यांचे शेजारी राहणारे शिवकुमार शंकर पाटील, दीपक बाबू जांभारे यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने आत प्रवेश केला व घरातील रोख रक्कम १९ हजार ५०० व १ हजार रुपयांचे चांदीचे पैंजण असा २० हजार ५०० रुपयांवर चोरट्याने डल्ला मारला. या प्रकरणी उत्तम वीर यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com