महिला व युवतींकरिता उद्योजकता परिचय वेबीनार
नवी मुंबई, दि.05:- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम सी ई डी) आणि महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन, आयुक्त कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व युवतींना पहिल्या पिढीचे यशस्वी उद्योजक बनण्यासाठी दि. 06 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता गूगल मीट द्वारे ऑनलाईन उद्योजकता परिचय वेबीनार आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला उद्योजकता धोरण आणि महिला उद्योजकता कक्ष या अंतर्गत उद्योजकता परिचय उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक महिला व युवती यांनी आपले संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, प्रस्तावित उद्योग याची माहिती punepomced3@gmail.com या ईमेलवर/व्हॉट्सअप करण्यासाठी क्रमांक ९४०३०७८७५२/९४०३१३१२९२/एस एम एस करण्यासाठी क्रमांक ७०४५१७२७३६/७४००११०५८० यावर पाठवावी असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
माहिती प्राप्त झाल्यानंतर गूगल मीट लिंक तात्काळ पाठविण्यात येईल. सर्व इच्छुक महिला युवती उमेदवार आणि भावी यशस्वी महिला उद्योजक यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण आणि महिला उद्योजकता धोरण या उद्देशाने या ऑनलाईन उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शशिकांत कुंभार वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे. यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सौ. भारती सोसे राज्य समन्वयक महिला उद्योजकता विकास कक्ष महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद येथे ९४०३६८३१७३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
www.konkantoday.com