सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला लवकरच परवानगी मिळणार :नारायण राणे
नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला केंद्र सरकारची लवकरच परवानगी मिळणार असून अशी ग्वाही केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांना दिली.
त्यामुळे विमानतळाला केंद्र सरकारची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या महिन्याभरात विमानतळाचे उद्घाटन ना. मंत्री केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि ना. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माहिती दिली.
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची त्यांच्या दालनात भेट घेतली आणि सिंधुदुर्ग येथील हवाई वाहतूक चर्चा केली. विमानतळाला केंद्रीय मंत्री वाहतूक मंत्री यांनी तात्काळ मंजुरी देत देऊ अशी ग्वाही दिली .
आपल्या सोबत उद्घाटनास स्वतः केंद्रीय मंत्रीज्योतिरादित्य सिंधिया येणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. अनेक वर्षे रेंगाळलेल्या चिपी विमानतळाचा शुभारंभ आता महिनाभरात होणार असून याचे भूमिपूजन ही ना . नारायण राणे यांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे आता उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे . हे विमानतळ बांधा वापरा या तत्त्वावर विमानतळाचे बांधकाम करण्याचा करार आयआरबी कंपनीने केला होता .
www.konkantoday.com