रत्नागिरीतील शहरातील वातावरण निरोगी , मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रांतर्गत सुरू असलेल्या अभ्यासातून निष्कर्ष
रत्नागिरी शहराची हवा प्रदूषणाची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २४ तासांच्या मानांकनाच्या मर्यादित आहे. लॉकडाऊनमुळे वाहनांच्या कमी प्रमाणातील वर्दळीमुळे आणि शहराची हवा प्रदूषण पातळी मानांकनाच्या मर्यादित आहे. शहरातील वातावरण निरोगी आहे, असा निष्कर्ष मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रांतर्गत सुरू असलेल्या अभ्यासातून काढण्यात आला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुदानातून शहराच्या हवा प्रदूषण मापन प्रकल्पाचे कामकाज मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्या रत्नागिरीतील कै. डॉ. धनंजय कीर उपकेंद्रात सुरू आहे. या प्रकल्पाचा औपचारिक उदघाटनप्रसंगी प्रकल्पप्रमुख डॉ. पांडुरंग पाटील यांनी शहराच्या हवा प्रदूषण प्रकल्पाबद्दल माहिती दिली.
www.konkantoday.com