संत निरंकारी मिशनच्या चिपळूण झोनच्या अंतर्गत रत्नागिरी क्षेत्रातील १०० सेवादलांची मोठी तुकडी स्वच्छता अभियानात सहभागी
चिपळूण शहरात नुकत्याच आलेल्या महापूरामुळे चिपळूण तसेच आजूबाजूच्या गावातील दुकानांचे आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले. शेकडो दुकानांसह घरामध्ये पाणी घुसल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील रस्ते,गटारे आणि घरांची साफसफाई करण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या चिपळूण झोनच्या अंतर्गत रत्नागिरी क्षेत्रातील १०० सेवादलांची मोठी तुकडी गेले पाच दिवस खाकी वर्दीमध्ये सेवा करीत आहे. हे सेवाकार्य पूर्ण शहरातील रस्ते आणि बाधित घरांची साफसफाई होईपर्यंत सुरू राहणार आहे.
www.konkantoday.com