विशेष बाब म्हणून चिपळूणसाठी १६ हजार कोरोना लस देण्याची मागणी
चिपळुणात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी अनेक संस्थांचे कार्यकर्ते येऊन गेले आहेत. येथील वर्दळ वाढली आहे. यावेळी मास्क आणि योग्य शारीरिक अंतराचे पालन करणे कुणालाही शक्य झालेले नाही. त्यामुळे या भागात लसीकरण जलदगतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून चिपळूणसाठी १६ हजार कोरोना लस मिळावी, अशा मागणीचे निवेदन येथील आय. एम. ए. संघटनेतर्फे प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे
www.konkantoday.com