मुली रात्रभर बीचवर फिरतात. त्याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही-गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेला उधाण
गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी नुकत्याच दोन अल्पवयीन मुलांवर झालेल्या बलात्कार प्रकरणावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. मुली रात्रभर बीचवर फिरतात. त्याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही. त्यांनी आत्मपरिक्षण करावं, असं मत प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलंय. विरोधकांनी सरकार जबाबदारी झटकू शकत नाही असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
www.konkantoday.com