मांडवी समुद्रकिनारी टॉय कार आणल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी कोरोना काळात गिऱ्हाईकांमध्ये सामाजिक अंतर न राखता मनोरंजनासाठी टॉय कार घेऊन आल्याप्रकारणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई बुधवार 28 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वा. करण्यात आली.
मंजीत मनोहर लोहार (27, रा. मांडवी, रत्नागिरी ) आणि नकुल हाजप्पा आयवाळे (18, रा.मुरुगवाडा, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक मांडवकर करत आहेत.
www.konkantoday.com