कृती दलाशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेणार
करोना रुग्णसंख्या घटल्याच्या पाश्र्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली. यानुसार दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तज्ञांचा समावेश असलेल्या कृतिदलाच्या सदस्यांबरोबर चर्चा केल्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.येत्या १तारखेपासून सध्या लागू असलेले र्निबध काही प्रमाणात शिथिल के ले जातील. सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे.ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे. दुकाने आणि उपहारगृहांच्या वेळेत वाढ करावी ही मागणी मंत्र्यांनी के ली.आहे
www.konkantoday.com