ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार-ऊर्जा मंत्री नितीन राऊत
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे वारंवार नुकसान होत असते. हे नुकसान टाळण्यासाठी ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणा नितीन राऊत यांनी केली आहे. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचे खूप नुकसान झाले आहे
उघड्यावर वीज यंत्रणा असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटाचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागतो. यावर उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे राऊत म्हणाले. कोकणात वारंवार नैसर्गिक संकटे येत आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले
www.konkantoday.com