महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल तर आम्हाला आनंदच आहे -शरद पवार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे अनेकांना आपले भाऊ, मुलगा वाटत आहेत. मुख्यमंत्री प्रत्येकाला आपले कुटुंबप्रमुख वाटणे त्यांचं यश आहे असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्रालादेखील अपेक्षा आहेत असं सांगत उद्धव ठाकरे त्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.तेव्हा शरद पवारांना संजय राऊतांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल तर आनंदच आहे”.
www.konkantoday.com