दरवर्षीचा चांदेराई बाजारपेठेत पुराचा धोका टाळायचा असेल संरक्षण भिंत बांधावी -माजी सरपंच दादा दळी

0
450

चांदेराई बाजार पेठे मध्ये दरवर्षी काजळी नदीच्या महापुरामध्ये ग्रामस्थाचे मोठया प्रमाणावर नुकसान होते, नदीतील गाळ उपासने हे एकमेव उपाय यावर आहे परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती दरवर्षी उद्भवते असे परखड मत दादा दळी यांनी व्यक्त केले.
यावर्षी चांदेराई हरचिरी मधील अनेक घरे व दुकाने पाण्याखाली गेली. यात आणखी कहर म्हणजे पुराने चांदेराई पुलाच्या कथड्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली तर राज्य महामार्ग क्रमांक 163 हा नादिकिनाऱ्यारूनच जातो तर चांदेराई ते हरचिरी दरम्यान दोन ठिकाणी दरडी कोसळून नदीपात्र जवळपास रस्त्याला टेकले आहे..दोन्ही ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ उपाय योजना करावी व संभाव्य धोका टाळावा..तसेच चांदेराई बाजारपेठ व राज्यमहामार्ग वाचवायचा असल्यास किमान 2 km ची चांदेराई पुलापासून MIDC धरणापर्यंत संरक्षक भिंत बांधावी अशी आग्रही मागणी माजी सरपंच दादा दळी यांनी केली आहे..खर तर सार्वजनिक बांधकाम खात्याला या रस्त्याला आवश्यक असणाऱ्या बाबी उदा. गुरव हॉटेल जवळची मोरी, संरक्षक भिंत, पुलाचा कठडा ..हरचिरी वेल्ये वाडी येथील लोकवस्तीला रस्त्या लगत संरक्षक भिंत होणे गरजेचे आहे हे सांगूनही डांबर घालण्यातच जास्त इंटरेस्ट आहे..असा आरोप दादा दळी यांनी केला आहे..नदीतील गाळ न काढल्यामुळेच नदी पात्र रुंद होत असून नदीकीनारी होणारी धूप अपघातास कारणीभूत ठरू शकते..
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here