कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील अंगारकी यात्रा उत्सव रद्द
गणपतीपुळे* : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांचे मार्फत स्वयंभू गणेश मंदिरात मंगळवार दिनांक २७ जुलै रोजी अंगारकी यात्रा उत्सव होणार होता. मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही अंगारकी यात्रा उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थान श्री देव गणपतीपुळे च्या वतीने देण्यात आली आहे.
www.konkantoday.com