राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या मंगळवार 27 जुलै 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी दि.26:- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या मंगळवार 27 जुलै 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार 27 जुलै 2021 रोजी दुपारी 1.15 वाजता जि. रायगड येथून हेलिकॉप्टरने आरजीपीपीएल, दाभोळ ता. गुहागर जि. रत्नागिरी हेलिपॅड येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता आरजीपीपीएल गेस्ट हाऊस दाभोळ ता. गुहागर जि. रत्नागिरी येथून मोटारीने ता.चिपळूण जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे आगमन व पूरग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 3.45 वाजता ता.चिपळूण जि. रत्नागिरी येथून मोटारीने आरजीपीपीएल गेस्ट हाऊस दाभोळ ता. गुहागर जि. रत्नागिरीकडे प्रयाण. सांयकाळी 4.30 वाजता आरजीपीपीएल गेस्ट हाऊस दाभोळ ता. गुहागर जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.45 वाजता आरजीपीपीएल, दाभोळ ता. गुहागर जि. रत्नागिरी हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.