रत्नागिरी पालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या ऑफलाईन लसीकरण प्रक्रियेत स्थानिक नगरसेवकांना विश्‍वासात घ्यावे

जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि रत्नागिरी पालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या ऑफलाईन लसीकरण प्रक्रियेत स्थानिक नगरसेवकांना विश्‍वासात घ्यावे, असा ठराव आज पालिकेच्या सभेत करण्यात आला. त्यामुळे वॉर्डनिहाय स्थानिक नागरिकांच्या लसीकरणाला गती मिळणार आहे.
जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि रत्नागिरी पालिकेतर्फे शहरात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये केंद्राला मिळणार्‍या एकूण लसींपैक ५० टक्के ऑनलाईन तर ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करून ती दिली जात आहे. शहरात तीन केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शहरात हा कार्यक्रम राबविला जात असताना स्थानिक नगरसेवकांचा विचार होत नाही. शहराबाहेरील ग्रामस्थांची नोंदणच जास्त होत असल्याने वादविवाद होत आहेत. त्यामुळे आजच्या सभेमध्ये लसीकरणाचा हा विषय चर्चेत आला www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button