कोल्हापुरात पंचगंगेची पातळी वाढली ,मलकापूरजवळील येलूर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कोल्हापूर- रत्नागिरी मार्ग बंद

0
158

बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर पकडला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने मार्ग बंद झाले आहेत.
पंचगंगेच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.
गुरुवारी सकाळी सात वाजता पंचगंगा ३५. ७ फुटांवरून वाहू लागली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता हीच पाणीपातळी ३१.३ फुट होती. पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट असून धोकापातळी ४३ फूट आहे. बुधवारच्या तुलनेत पावसाचा जोर जास्त असल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीची इशारा पातळीकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.
कोल्हापूर- गगनबावडा रोडवर मांडुकली येथील पुलावर पाणी आल्याने मध्यरात्री हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे दोन्ही बाजुला वाहनांची मोठी रांग लागली होती. तसेच मलकापूरजवळील येलूर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कोल्हापूर- रत्नागिरी मार्ग बंद झाला हाेता
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here