कोकणात हाहाकार चिपळूण , खेड पाण्याखाली.पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी एनडी आरएफ च्या टीम कार्यरत


खेड दि .२२ ( सावा ) गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने कोकणात हाहाकार उडवला आहे . खेडमध्ये जगबुडी आणि नारिंगी नदीला तर चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला महापूर आला असल्याने खेड व चिपळूण ही दोन्ही शहरं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत . पुराच्या पाण्यात अनेकजण अडकून पडले असून मदतीसाठी याचना करत आहेत . खेड व चिपळूण येथे एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या असून मदत कार्याला सुरवात झाली आहे . २७ जूलै २००५ पेक्षाही भयंकर परिस्थिती उद्भवली असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे .
काल दिवसभर ढगफूटी झाल्यासारखा पाऊस पड्ला . त्यामुळे वाशिष्ठी , जगबुडी , नारिंगी या नदयांच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली . रात्री १० वाजण्याच्या सुमारास नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून शहरात घुसायला सुरवात केली आणि बघता बघता चिपळूण आणि खेड ही दोन्ही शहर जलमय झाली .
सह्याद्रीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेडची जगबुडी व नारिंगी ह्या दोन्ही नद्या काल सायंकाळपासूनच धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या होत्या . त्यामुळे शहरातील नागरिकांसह नदीकिनारी असलेल्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता . नगरपालिका प्रशासन नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून होते . अखेर रात्री दहा वाजता जगबुडीचे पाणी मटण मच्छी मार्केट येथून तर नारिंगी नदीचे पाणी दापोली नाका येथून बाजारपेठेत शिरू लागले आणि बघता बघता खेडची बाजारपेठ पूर्णपणे जलमय झाली .
बाजारपेठेत पाणी भरू लागताच व्यापाऱ्यानी दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रयत्न केला मात्र रात्रभर वीजेचा लपंडाव सुरू राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .
खेड शहरातील सफा मस्जिद चौक , वालकी गल्ली , गुजरअळी , तीनबत्ती नाका परिसरात ५ फुटा पर्यंत पाणी आले . २००५ साली खेडमध्ये आलेल्या पुराच्या आठवणीने नागरिकांच्या ऊरात धडकी भरली .
पुराचे पाणी शहरातील कोवीड केअर सेंटर मधे ही घुसल्याने रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले .
पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम रात्रभर सुरू होते . त्यातच सर्वच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क गायब झाल्याने संपर्क साधण्यास अनेक अडचणी निर्माण होत होत्या .
२००५ साली झालेल्या अतिवृष्टी दरम्यान जगाबूडी नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी गेले होते . तब्बल १६ वर्षांनी ही पुनरावृत्ती झाली . जगाबुडीला आलेल्या महापूरात या वर्षाही जगबुडी नदीवरील जूना ब्रिटीशकालीन पुल पाण्याखाली गेला .
कोकणात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा फटका कोकण रेल्वे , एसटी सेवेलाही बसला . कोकणातील पुल पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील वाहतुकीलाही ब्रेक लागला . पावसामुळे गामीण भागातही नुकसान झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button