राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.-राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. याबाबत आम्ही हायकोर्टात प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू झालेला नाही असं केंद्र सरकारनं काल संसदेत सांगितलं होतं. त्यावरुन केंद्रावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर टोपे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
www.konkantoday.com