
पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या पाच जिल्ह्यांना आज व उद्या रेड अर्लट
पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत जोरदार ते मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ,पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या पाच जिल्ह्यांना आज (२१ जुलै) व उद्या (२२ जुलै) रोजी रेड अर्लट देण्यात आला आहे. तर, मुंबईला ऑरेंज अर्लट दिला आहे.
मुंबई-ठाण्यात २१ जुलैला, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी २१, २२ जुलैला अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्य़ांतील घाट क्षेत्रातही याच कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रात हलका, तर विदर्भात काही ठिकाणी मध्यम सरींची शक्यता देखील सांगण्यात आली आहे.
www.konkantoday.com