कोणी सांगितलं तुम्हाला कोकणी माणूस आळशी आहे.

0
482

कोकणी माणूस आळशी आहे, प्रत्येक गोष्टी मध्ये वाद आणि भांडणे आणि त्यामुळे कोकणचा विकास होऊ शकत नाही.हा सर्वांचा आवडता सिद्धांत आहे. कोणत्याही शासकीय यंत्रणेमध्ये आपण योजना राबवायला गेलो तर शासकीय अधिकारी हे आपल्याला सांगतात. एकूण महाराष्ट्राच्या

विकासाच्या धोरणांमध्ये कोकणात कोणत्याही योजना राबवू नयेत कारण येथील लोक सहकार्य करत नाहीत वाद घालतात
असाच साधारण दृष्टिकोन दिसून येतो. गेली वीस वर्ष शासकीय यंत्रणांबरोबर काम करताना मी स्वतः हा अनुभव सातत्याने करतो. सगळेजण असे म्हणतात म्हणून हळूहळू यावर आपलाही विश्वास बसू लागतो. एकूण कोकण विकासाच्या प्रक्रियेत सर्वच पातळीवरची उदासीनता पाहता
आपल्यालाही हळूहळू नैराश्य येते.आता मी कोकणची दुसरी बाजू सांगतो.

कोकणात जवळपास चार लाख एकर जमिनीवर हापूस आंब्याची लागवड आहे. यातील जास्तीत जास्त बागा या
मालवण देवगड राजापूर रत्नागिरी च्या जांभा दगडाच्या कातळावरती आहेत. एकदा जाऊन या बागा आणि या बागांचे संगोपन करणारा कोकणी आंबा बागायतदार
यांना आपण भेटलं पाहिजे. डोक्यावरून पाणी आणून अशी हजारो आंब्याची झाड त्यांनी लावली आणि वाढवली
त्यांना आपण सलाम कराल. किती कष्ट केले असतील या माणसांनी. आणि हा जगातील फळांचा राजा, लहरी पिक
प्रचंड काळजी घेऊन हे शेतकरी आंब्याची उत्पन्न घेतात
पण विकत कोण कोकणा बाहेरील दलाल. संपूर्ण आंब्याचे मार्केट दलालांच्या हातात. गेली अनेक वर्ष कोकणातल्या शेतकऱ्यांना लुटले जात आहे. तरी हा माझा प्रचंड चिकाटी असलेला आणि परिश्रम करणारा शेतकरी हरला नाही. आज महाराष्ट्रात फळांमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था दोन हजार कोटी रुपये हापूस आंबा मधून मिळतात. आणि संपूर्ण जगात भारताचे महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव हापूसमुळे आहे

हापूस आंबा ही कोकणातील दोन हजार कोटी ची अर्थव्यवस्था
आहे. सोबतीला काजू नारळ जांभळे आहेत. आज पर्यंत शासनाने आणि सरकारने कधी कोकणातील आंबा बागायतदारांना मदत केली. आणि तरीही तो आज टिकून आहे.
महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाते. मग आंबा बागायतदारांना का मदत केली जात नाही ? मला अनेक आंबा बागायतदार शेतकरी माहिती आहेत ज्यांच्या डोक्यावर एक एक कोटी रुपयांचे कर्ज आहे. आणि तरीही या जिद्दी माणसाने कधी आत्महत्या केली नाही.

कोणी सांगितलं तुम्हाला की कोकणी माणूस आळशी आहे.
तुम्ही रिकामटेकड्या लोकांना भेटता आणि आपले मत बनवता. कोकणी माणूस किती मेहनती आहे हे पाहायचं असेल

तर एकदा आमच्या कोळी बांधवांना भेटा. रोज पहाटे तीन-चार वाजता जागा होऊन प्रचंड थंडी ऊन पावसातून
रोज जीवाची बाजी लावून तो आपल्या छोट्या मोठ्या होड्या घेऊन समुद्रात जातो. चार वेळा समुद्रात जातो तेव्हा एकदा मासे मिळतात. या माशाचा व्यापार उत्तर भारतीय करतात.
एक तर ग्लोबल वार्मिंग आणि अनिर्बंध मासेमारी मुळे मासे मिळत नाही. आणि कधीतरी समृद्ध असलेल्या आमच्या कोळी भगिनी आणि हे कोळी बांधव आत्ता जवळपास
कर्जबाजारी झाले आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला कोकणी माणूस आळशी आहे आहे.

कोकणातील लाखो मच्छीमार बांधव जितके परिश्रम करतात
इतके परिश्रम कोणीच करत नसेल. पण इतके परिश्रम केल्यानंतर यश मिळत नसेल तर याला जबाबदार कोण. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तीन तीन वेळा कर्जमाफी दिली. महाराष्ट्राला दरवर्षी पंधरा हजार कोटी रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या आणि राज्याला विदेशी चलन मिळवून देणाऱ्या आमच्या कोकणातील मच्छिमार बांधवांना का नाही इतक्या वर्षात एकदा कर्ज माफी मिळाली. हजारो कोटीचे मासेमारी प्रक्रियेचे कारखाने महाराष्ट्रात आहेत. आणि यातून टॅक्स स्वरूपात राज्याला भरपूर उत्पन्न माहिती. का राज्यातील मत्स्यव्यवसायाला आजपर्यंत प्रोत्साहन दिले गेले नाही आणि यांच्यासाठी योजना नाहीत. अलीकडे कोकणात पर्यटन व्यवसाय विकसित होत आहे.

मला सांगताना अभिमान वाटतो मालवणपासून डहाणूपर्यंत
आज कोकणात हजारो हॉटेल ,लॉजिंग ,कृषी पर्यटन, होमस्टे
असे व्यवसाय आहेत. आणि यातील जवळपास 95 टक्के व्यवसाय आमचे कोकणातील तरुण चालवतात. मंगेश मोरे शैलेश मोरे, कुंदन पाटील ,प्रभाकर सावे , महादेव निजाई,बाबा मोंडकर श्याम खातु परब, गावकर ,सावंत ,म्हात्रे ,ही सगळी आमची कोकणातले मुल / व्यवसायिकआहेत. 50 लाख, एक कोटी ,दोन कोटी, कर्ज उभारून शानदार प्रकल्प उभे केले आहेत. काही संपूर्ण देशात आदर्श ठरतील असे प्रकल्प आहेत.
बँका कर्ज देत नाहीत सरकारी अधिकारी परवानगी देत नाहीत ,सीआरझेड या सगळ्यावर मात करून या मुलांनी आपले उद्योग उभारलेत. आणि कुठलीही शासनाची मदत अपेक्षित न ठेवता ते चालवतात. दोन वर्ष कोण आहे, एका वर्षात दोन चक्रीवादळ आले. कोकणातील पर्यटन व्यवसायाची कंबरडे मोडले आहे. तरीही या तरुणांना या व्यावसायिकांना मदत करावी असा कोणी विचार करत नाही आहे. सत्तर वर्ष दर वर्षी मदत करून सुद्धा साखर उद्योग आजही शाश्‍वत नाही. आजही सबसिडी कर्जमाफी सवलती द्याव्या लागतात. का कोकणातल्या पर्यटन उद्योगाला सबसिडी ,सवलती

औद्योगिक दराने वीज पुरवठा, सहजपणे परवानग्या , केरळ प्रमाणे शासकीय स्तरावर मार्केटिंगच्या व्यवस्था केरळ प्रमाणे जगभर प्रमोशन
असा विचार आजपर्यंत का झाला नाही. महाराष्ट्र राज्यात आंबा बागायतदारांसाठी 0 बजेट

मच्छीमार विकसित व्हावा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी 0 बजेट
आणि कोकणातील पर्यटनाच्या विकासासाठी सुद्धा जवळपास 0 बजेट. एकूणच कोकणच्या विकासासाठी 0 बजेट हे शासनाचं गेली सत्तर वर्ष धोरण आहे कसा होणार कोकणचा विकास ?

या प्रत्यक्ष विकासांच्या विषयांवर कोणीच बोलत नाही आणि हो समृद्ध कोकण संघटनेच्या माध्यमातून यापुढे या विषयांमध्ये आम्ही बोलणार, भांडणार, आंदोलन करणार आणि रचनात्मक काम सुद्धा करणार केवळ सरकारने मदत ठेवावी ही अपेक्षा न ठेवता आम्ही एकत्र येऊन आमचे उद्योग विकसित करणार आणि सरकारला मदत करायला भाग पाडणारे. नकारात्मक नाही पण रचनात्मक अभियान आम्ही सुरु केली आहे.

संजय यादवराव
कोकण भूमी प्रतिष्ठान ग्लोबल कोकण
समृद्ध कोकण संघटना
कोकण हायवे समन्वय समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here