अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी चोरटय़ांनी लांबवली,आरोपी अटकेत

0
59

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री नऊ वाजताच्या सुमारास चालण्यासाठी बाहेर पडलेल्या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी लांबवली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला 24 तासांच्या आत अटक करण्यात आली असून त्याने अभिनेत्री सविता मालपेकरची सोनसाखळी हिसकावल्याची कबुलीही दिली आहे.  सविता यांनी मुंबई पोलिसांच्या वेगाने चौकशी केल्याबद्दल आणि चोवीस तासांत आरोपींना पकडल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here