अनेक तास बंद असलेली रेल्वेमार्गावरील वाहतूक काल रात्रीपासून पूर्ववत
कोकण रेल्वे मार्गावर गोवा राज्यातील करमाळी आणि थिव्हिम स्टेशन दरम्यान असलेल्या जुना गोवा बोगद्यात सतत मुसळधार पावसामुळे सोमवारी ट्रॅक वर माती व पाणी आल्याने सोमवारी पहाटे ४ वाजल्यापासून ठप्प झालेली कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल १९ तासांनी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान पूर्ववत झाली.
थिव्हिम स्टेशन दरम्यान असलेल्या जुना गोवा बोगद्यात सतत मुसळधार पावसामुळे सोमवारी ट्रॅक वर माती व पाणी आल्याने या ट्रॅक वरील माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या कालावधीत सर्व गाड्या नजीकच्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
कालांतराने काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.याचा मोठा परिणाम रेलवे वाहतुकीवर झाला होता.
www.konkantoday.com