लांज्यात खरेदीसाठी आलेल्या महिलेचा १ लाख ३७ हजारांचा ऐवज लंपास
लांजा येथे दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा १ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबविला. ही घटना शुक्रवारी १६ जुलै रोजी सकाळी ११ वा. लांजा शहरातील झमझम बँगल मार्ट या दुकानात घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. प्रज्ञा शशिकांत साठे (३७, रा. खेरशेत, ता. चिपळूण) या शुक्रवारी १६ जुलै रोजी सकाळी ११.१० वा. दरम्याने लांजा शहरातील झमझम बँगल मार्ट या दुकानात साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या.
www.konkantoday.com