प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मुंबईतील एनजीओ दाखल होतील त्यांचा रोखठोख समाचार घेणार-माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी
सोलगाव बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता सावधानता बाळगण्याची गरज असून या भागात रिफायनरीचे पडघम वाजायला लागल्याने हमखास मुंबईतील एनजीओ दाखल होतील त्यांचा रोखठोख समाचार घेण्यासाठी आमच्यासोबत सज्ज रहा असा खणखणीत इशारा माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी दिला आहे.श्री.काझी हे बारसू भागातील बागायतदार असून गोवळ-शिवणे- बारसू रिफायनरी समर्थक समितीचे अध्यक्ष आहेत. एनजीओंच्या कारवायांबाबत सविस्तर भूमिका मांडलीआता बारसू येथे सरकारने कोणतीही रिफायनरी जाहीर केलेली नसताना संघर्ष समिती स्थापन करण्याची चढाओढ या एनजीओने लावलेली आहे.यांचा उद्देश हा प्रकल्प कंपन्यांबरोबर सेटींगचा असतो हे आता लपून राहिलेले नाही. जे आरोप अणुऊर्जा प्रकल्प, जिंदाल, फिनोलेक्स तसेच अगदी आयलॉग जेटी प्रकल्पांकरिता लावण्यात आले तेच आता बारसू सोलगावच्या ग्रामस्थांना रिफायनरी प्रकल्प संदर्भात सांगण्यात येतील असे काझी यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com