चिपळूण शहरातील बेंदरकर आळी येथील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली
चिपळूण शहरातील बेंदरकर आळी येथील सचिन देवरुखकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे गूढ कायम असले, तरी तो गेले काही दिवस तणावाखाली वागत होता. त्याच्या वागण्यात मोठा फरक पडला होता. त्यामुळे मानसिक तणावातून त्याने असे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा परिसरात ऐकण्यास मिळत आहे
चिपळूण तसेच मुंबई व पुणे येथे देवरुखकर ज्वेलर्स म्हणून प्रसिद्ध असलेले सुभाष देवरुखकर यांचा मुलगा सचिन देवरुखकर याने शुक्रवारी सायंकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले
www.konkantoday.com