विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आखावे-मुख्यमंत्री
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. यादृष्टीने धार्मिक, सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आखावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज केली. महाराष्ट्राने ठोस पावले उचलून दुसऱया लाटेचा सामना केलाच, पण तिसऱया लाटेला रोखण्यासाठी सज्ज असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितले.
www.konkantoday.com