वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे -प्रवीण दरेकर
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा दुसऱ्या वर्षीही पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर कठोर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच, १७ ते २५ जुलैपर्यंत नऊ दिवस पंढरपूर व परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अकलुज येथे माध्यमांशी बोलताना टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. “वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे. या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत.” असं दरेकर म्हणाले आहेत.
www.konkantoday.com