राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास पीकविम्याची मुदत वाढवण्यास केंद्र सरकारची तयारी
पिकविमा भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पण, इच्छा असुनही अनेक शेतकऱ्यांना विविध अडचणींमुळे पिकविमा भरता आला नव्हता. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास पीकविम्याची मुदत वाढवण्यास केंद्र सरकारची तयारी, असं ते म्हणाले आहे. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्यास पिकविमा भरण्यास शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात येईल, असं आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
www.konkantoday.com