कंत्राटी कामगारांच्या थकीत पगारासाठी करण्यात येणारे भीक मागो आंदोलन स्थगित
दापोली नगरपंचायतीच्या अस्थायी व कंत्राटी स्वच्छता कर्मचार्यांना दोन महिन्यांचा थकीत पगार न दिल्यास दापोली शहरात भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला होता. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोगडे यांनी या कर्मचार्यांचा थकीत पगार आठ दिवसात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने भीक मांगो आंदोलन तूर्त स्थगित केले असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष संदीप केळकर यांनी दिली.
www.konkantoday.com