वनौषधी वनस्पती संवर्धनासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची गरज-अप्पर जिल्हाधिकारी श्री संजय शिंदे
लायन्स क्लब रत्नागिरी च्या अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेताच ला ऍड शबाना वस्ता ह्यांनी आपल्या टीम च्या सहकार्याने सेवाकार्यांची नव्या उत्साहात सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब रत्नागिरी आणि प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये यांचे संयुक्त विद्यमाने आणि लायन्स डिस्ट्रिक्ट पर्यावरण चेअरमन MJF लायन डॉ शेखर कोवळे आणि अध्यक्षा लायन ऍड शबाना वस्ता ह्यांच्या संकल्पनेतून वनौषधी वनस्पती कार्यशाळेचे मंगळवारी दि 13जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये येथे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 11 वाजता MJF लायन डॉ संतोष बेडेकर,अध्यक्ष लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, MJF लायन डॉ शेखर कोवळे, उपाध्यक्ष लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, लायन ऍड शबाना वस्ता, अध्यक्षा, लायन्स क्लब रत्नागिरी ह्यांचे हस्ते वनौषधी वनस्पतीला पाणी घालून मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन केले गेले लायन्स क्लब अध्यक्षा ऍड ला शबाना वस्ता ह्यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर MJF लायन डॉ शेखर कोवळे ह्यांनी प्रस्तावना करून आजच्या कार्यशाळेचे महत्व आणि गरज विषद केली.
आजच्या कार्यशाळेला मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री संजय शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित राहून ह्याकरिता विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची गरज प्रतिपादन केली. लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉ संतोष बेडेकर ह्यांनी आपल्या मनोगतामध्ये सरकारच्या आयुष ह्या कार्यक्रमाची माहिती दिली.
तांत्रिक सत्रामध्ये डॉ वैभव शिंदे नी ह्या वनौषधी वनस्पतींची माहिती देऊन त्यांचा कसा फायदा होऊ शकतो हे उदाहरणांसह विषद केले, आणि आपण स्वतः शेजारी असणाऱ्या ह्या संपत्तीचा फायदा न घेता बाजारातील प्रचंड महागडी औषधं आणि प्रसाधने वापरतो ह्यावर खेद व्यक्त केला, अनेक वनस्पतींची त्यांनी ओळख करून देऊन नारळाचे औषधी गुणधर्म सहज सोप्या भाषेत सांगितले.
दुसरे वक्ते संशोधन अधिकारी श्री सुनील घवाळी ह्यांनी उपस्थिताना तुम्ही वनस्पतीचे नाव सांगा मी त्याचे गुणधर्म सांगतो असे आवाहन करून अनेक वनस्पती ची माहिती दिली.ह्या कार्यशाळेमध्ये मधमाश्याचे संगोपन ह्याविषयावर डॉ वानखडे ह्यांनी सुंदर मार्गदर्शन केले, विशेष म्हणजे संगोपन करण्यात येणारी मधमाशी ही डंख मारीत नसल्याने ह्या जातीच्या मधुमक्षिका पालन करणे कठीण नाही ह्याची उपस्थितांना जाणीव करून दिली. ह्या यशस्वी कार्यशाळेला ला शामल सेठ, ला ऍड कार्तिकी शिंदे,वकील वर्ग, मत्स्य विद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शेतकरी वर्ग, आणि खास कोल्हापूर तसेच सोलापूर येथून आलेल्या शेतकऱ्यांचा समावेश होता, ह्या सर्व उपस्थितांना लायन्स क्लब रत्नागिरी कडून एक एक वनौषधी वनस्पती भेट देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिव लायन अभिजित गोडबोले आणि खजिनदार लायन गणेश धुरी ह्यांनी विशेष प्रयत्न केले.सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन लायन अभिजित गोडबोले ह्यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली
www.konkantoday.com