चिपळूण तालुक्यात मासे मारण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू
चिपळूण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला.
विकास शांताराम खडपेकर ( ४८, रा. वाघिवरे, चिपळूण ) असे बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. तालुक्यात संततधार पावसामुळे नदी – नाले तुडूंब भरून वाहत आहेत. असे असताना सोमवारी झालेल्या पावसामुळे वाघिवरे नदीची पाणी पातळीही वाढली आहे.
या नदीवर खडपेकर हे सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले.या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com