संजय कांबळे यांचे मरणोत्तर देहदान
रत्नागिरी, दि. ९ : तळेकांटे येथिल सामाजिक कार्यकर्ते संजय भागुराम कांबळे यांचे त्यांच्या राहत्या घरी दिनांक ५ जुलै रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देहदानाचा संकल्प त्यांच्या कुटुंबियांनी पुर्ण करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कुटुंबियांनी मरणोत्तर देहदानासाठी सावर्डे येथिल श्री विठ्ठलराव जोशी टॅरिटीज ट्रस्ट संचलित भ.क.ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण, सावर्डे, ता. चिपळूण येथे देहास अर्पण करण्यात आले.
गोरगरिबांच्या हाकेला नेहमी धावून जाणारे संजय कांबळे यांनी ग्राम पंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. गावच्या विकासात त्यांचे नेहमीच योगदान होते. तळेकांटे तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद म्हणून त्यांचे मोलाचे कार्य होते. पांगरी येथे विविध सोसायटीचे चेअमरमन पद त्यांनी भुषविले होते.
नेत्रदान आणि देहदान या बद्दल ते नेहमीच कळकळीने बोलत असत मात्र नुसते बोलून काही होत नाही तर त्यांनी ते आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
संजय कांबळे यांच्या या कृतीचा आदर्श इतरांनीही ठेवावा ही त्यांची अपेक्षा त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती.