खेड शहरात रस्त्यावर मोकाट फिरणार्या जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन
खेड शहरात रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असतात. कुत्रे-गुरे, गाढवे यांचा नाहक त्रास जनतेला होत असतो. रस्त्यावरील मोकाट गुरे, कुत्रे व गाढवांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात खेड भाजपाच्यावतीने खेड नगर परिषद मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, खेड शहरात सध्या मोकाट जनावरांचा त्रास होत आहे. गाढवे, कुत्रे, उनाड गुरे यांच्यामुळे शहरात अपघात सातत्याने होत असतात. तसेच बाजारपेेतील व्यावसायिकांनादेखील या उनाड जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या उनाड जनावरांचा त्वरित कोंडवाडा तयार करुन त्यांना बंदिस्त करावे. अशा प्रकारचे निवेदन खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना देण्यात आले.
www.konkantoday.com