राजापूर एसटी आगाराच्या वतीने गुरूवारपासून सकाळी आंबोळगड कोल्हापूर ही बस सुरू
राजापूर एसटी आगाराच्यावतीने गुरूवार दि. ८ जुलैपासून सकाळी सात वाजता सुटणारी आंबोळगड कोल्हापूर ही बस सुरू करण्यात येणार आहे.
आंबोळगड येथून सुटणारी ही बस नाटे, धाऊलवल्ली, राजापूर, पाचल, अणुस्कुरामार्गे कोल्हापूरला पोहोचणार असून दुपारी एक वाजता याच मार्गावरून परतीच्या प्रवासाला निघणार आहे. या बससाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांनी या फेरीचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी केले आहे.
www.konkantoday.com